‘त्या’ तरुणाच्या कुटुंबियांची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी घेतली सांत्वना भेट

यावल, प्रतिनिधी । काल यावल शहरात डेंगू सदृश्य आजाराने उच्चशिक्षित तरुणाचा अंत झाला असून या तरुणाच्या कुटुंबियांची आज जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार,  जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. देवराम लांडे तसेच डॉ. समाधान वाघ  यांनी सांत्वन भेट घेतली.

मृत तरुणाच्या घरी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. देवराम लांडे तसेच डॉ. समाधान वाघ यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी मृत तरूणाच्या कुटुंबातील सदस्य व नातेवाईक यांची भेट घेऊन त्यांची चौकशी केली.  गणपती नगर व पालक नगर भागाची पाहणी केली. प्रतिबंधात्मक उपाय योजना जसे  कोरडा दिवस पाळणे, गप्पी मासे सोडणे, फॉगिंग करणे, गावात दवंडी देणे आदी सूचना केल्या. घरातील व घराच्या आजूबाजूच्या परिसरातील तापाचे रुग्णांचे रक्त नमुने व जल नमुने जमा करून पुढील तपासणीसाठी धुळे येथे शासकीय महाविद्यालय पाठविण्यात आले.  या भागात दररोज दहा दिवस कंटेनर सर्वेक्षण व ताप सर्वेक्षण करण्यात येत आहे.  आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करण्यात आले.  रक्त तपासणी करण्यात आलेल्यांमध्ये १७ नागरीक हे संशयीत असल्याचे आरोग्य सुत्रांकडुन सांगण्यात आले .  हे सर्वेक्षण आरोग्य पर्यवेक्षक विजय नेमाडे आरोग्यसेवक आर. एस. तडवी, आरोग्यसेवक एस. डी. अहिरराव, गिरीश जावळे, सतीश पवार, अनिकेत बोरसे यांनी केले. यात ३३०  घरांमध्ये दूषित घरे ५९  व ७६ दूषित भांडी आढळून आले आहेत.

 

Protected Content