जिल्हाधिका-यांचा आदेश येताच रावेर महसूल विभाग ऍक्शन-मोडवर

 

रावेर, प्रतिनिधी । जिल्हाधिका-यांच्या आदेशानंतर रावेर व सावद्यात अनेक मेडीकलांची रेमडीसीवीर संदर्भात  तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्याकडून झाडाझडती घेण्यात आली. मात्र, यासाठी तहसिलदार यांना जिल्हाधिका-यांच्या आदेश्याची वाट बघावी लागली.

जिल्हाभरात रेमडीसीवीरचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यापर्यंत गेल्या नंतर आज रेमडीसीवीरचा काळाबाजार करणा-यांवर कारवाईची तंबी देताच. स्थानिक महसूल प्रशासन खळबळुन जागी झाले व आज सूटीच्या दिवशी सावद्यासह रावेरच्या १९ मेडीकलची तपासणी करण्यात आली. यापैकी वल्लभ मेडिकल यांच्या कडे १२ रेमडीसीवीर स्टॉक उपलब्ध आहे. सर्व महत्त्वाच्या दुकानांची तपासणी करून रेमडीसीविरचा किती स्टॉक आहे याची माहिती म जिल्हाधिकारी यांचेकडे देण्यात आली. यासाठी सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांना साठा घेण्यासाठी कार्यान्वित करून माहिती प्राप्त करून घेतली.

 

Protected Content