Home धर्म-समाज पाचोरा येथील आकाश महालपुरे यांना आदर्श सेवा सन्मान पुरस्काराने गौरव

पाचोरा येथील आकाश महालपुरे यांना आदर्श सेवा सन्मान पुरस्काराने गौरव


पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील गोंदेगाव येथील रहिवाशी महाराष्ट्र पत्रकर संघाचे जिल्हाध्यक्ष आकश महालपूर यांना नुकताच श्‍राज्यस्तरीय आदर्श सेवा सन्मान २०२१’ या पुरस्काराने सन्मानित केले आहे.

विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळीच्या उपस्थितीत अध्यक्ष मिर्झा गालिब मुजावर यांच्या वतीने २१ मार्च २०२१ मल्टीपर्पज हॉल धायटी, सांगोला (सोलापूर) येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. दैनिक तुफान क्रांतीतर्फे दरवर्षी समाजप्रबोधन, साहित्य, कला, क्रिडा, संस्कृती, विज्ञान, संगीत आदी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीस वा संस्थेस हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. वैचारिक मांडणी समाजात करत असलेल्या साहित्यातील अनमोल कार्यामुळे “आकाश महालपूरे” हे प्रसिद्ध साहित्यीक आहे. नुकतचं त्यांना साहित्यातील अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. या पुरस्कारानिमीत्त त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


Protected Content

Play sound