बँकेत नोकरीच्या आमिषाने तरूणाची ऑनलाईन फसवणूक

 

जळगाव प्रतिनिधी । एचडीएफसी बँकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत महाबळ येथे राहणाऱ्या तरुणाची ६४ हजार रुपयाची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार १९ मार्च रोजी उघडकीला आला आहे.  जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंजीत  प्रल्हाद जागीड (वय-25, रा.विद्युत नगर, महाबळ कॉलनी) हा तरुण शिक्षण घेत आहे. दरम्यान 26 फेब्रुवारी ते 18 मार्च 2021 दरम्यान काही अनोळखी नंबर वरून आणि ई-मेलच्या आयडी मार्फत एचडीएफसी बँकेचे नाव लोगो असलेले बनावट कागदपत्रे पाठवून मंजीत जागीर याला एचडीएफसी बँकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवले. भावना विकास जैन, अनन्या गुप्ता आणि स्वाती शर्मा असे तिघांनी बनावट नाव सांगून तिघांनी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये मंजीत कडून सुमारे 64 हजार 574 रुपयांची आर्थिक लाभासाठी ऑनलाईन पैसे टाकण्याचे सांगितले. त्यानुसार मंजीत जागीर याने ऑनलाइन पद्धतीने ६४ हजार  ५७४ रुपये टाकले.

 

दरम्यान दरम्यान पैसे पाठवूनही  नोकरी मिळाली नसल्यने आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर मंजीतने तातडीने सायबर पोलीस स्टेशनला धाव घेत पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांना माहिती कथन केली. मंजीत यांच्या फिर्यादीवरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक बळीराम हिरे करीत आहे.

Protected Content