गटारीच्या सांडपाण्यावरून दाम्पत्याला बेदम मारहाण

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील वाघनगर परिसरात असलेल्या जिजाऊ नगरात गटारीचे सांडपाणी वाहत असल्याच्या कारणावरून दाम्पत्याला चौघांकडून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात चौघांवर गुन्हा Fir दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, राजु किसन बाविस्कर (कोळी) (वय-४०, रा.जिजाऊ नगर वाघनगर परिसर, जळगाव) हे आपल्या पत्नीसह राहतात. १९ मार्च रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास गटारीचे पाणी रस्त्यावर आल्याच्या कारणावरून शेजारी राहणारे शशिकलाबाई पुंजू बाविस्कर, पुंजू नथ्थू बाविस्कर, सावित्रीबाई पुंजू बाविस्कर आणि संतोष पुंजू बाविस्कर सर्व रा.जिजाऊ नगर जळगाव यांनी राजू बाविस्कर यांना लाकडी दांडक्याने कमरेवर मारून हाड फॅक्चर केले. तसेच राजू बाविस्कर यांच्या पत्नीला देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी राजू बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात चौघांवर गुन्हा Fir दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संजय भालेराव करीत आहे.

Protected Content