बुलडाणा प्रतिनिधी । राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी नुकतीच खामगांव तालुक्यातील बोथाकाजी प्राथमिक आरोग्य केंद्राला सरप्राइज व्हिजीट देत पालकमंत्र्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामधील आरोग्य व्यवस्थांची पाहणी केली.
तसेच लसीकरण कक्षामध्ये लसींचा साठा, सुरू असलेले लसीकरण याबाबत माहिती पालकमंत्री यांनी घेतली. लसीकरण करण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता आणून लसीकरणाचा वेग वाढविण्याचा सुचना यावेळी पालकमंत्री यांनी दिल्या. येथील बाह्य रूग्ण विभाग, आंतर रूग्ण विभाग, औषध भांडार आदींचीही पाहणी केली. याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.