जळगावात शालकांकडून मेव्हाण्यास बेदम मारहाण

जळगाव प्रतिनिधी । माझ्या बहिणीला आमच्याकडे उसनवार घेतलेले पैसे घेण्यासाठी का पाठवतो असे म्हणत चुलत शालकांकडून मेव्हाण्यास लोखंडी रॉडने मारहाण करीत जखमी केल्याची घटना १३ मार्च रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास रामानंदनगर जवळील म्युनसिपल कॉलनीत घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शहरातील जिजाऊ नगरातील रहिवासी मुकूंदा यशवंत सपकाळे (वय ४९) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. १३ मार्च रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास ते म्युनसिपल कॉलनीतील हनुमान मदिराजवळ पाय जात असतांना त्यांचे चुलत शालक निलेश प्रदिप कोळी, स्वप्निल मधुकर कोळी, मयुर मधुकर कोळी व प्रदिप नथ्थू कोळी यांनी त्यांना थांबवित शिविगाळ करीत माझ्या बहिणीला आमच्याकडे का म्हणून पैसे मागण्यास पाठवितो असे म्हणत निलेशने त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारत जखमी केले. त्यानंतर उर्वरीत तिघांनी मुकूंदा सपकाळेंना शिवीगाळ करीत लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत जखमी करीत त्याठिकाणाहून पसार झाले.

मारहाणीत मुकूंदा सपकाळे हे बेशुद्ध होवून रस्त्यावर पडले होते. यावेळी अनोळखी इसमाने त्यांन घरी नेवून सोडले. दरम्यान सपकाळे हे शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी घडलेली घटना आपल्या पत्नीकडे कथन केली. दरम्यान ते तक्रार देण्यासाठी रामानंद नगर पोलिसात आले असता त्यांना पोलीसांनी उपचारासाठी मेडीकल मेमो दिल्याने ते उपचारासाठी दाखल झाले होते. आज त्यांनी प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांनी चारही शालकांविरुद्ध तक्रार दिली असून त्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content