Home Cities जळगाव माजी उपमहापौर गणेश सोनवणे यांचे निधन

माजी उपमहापौर गणेश सोनवणे यांचे निधन

0
161


जळगाव प्रतिनिधी । जळगाव महापालिकेचे माजी उपमहापौर गणेश बुधो सोनवणे यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.

गणेश बुधो सोनवणे हे २००८ साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले होते. ते महापालिकेतील विरोधी पक्षनेते होते. यानंतर २०१३ साली ते खान्देश विकास आघाडीकडून महापालिकेत निवडून गेले. या पंचवार्षिकमध्ये शेवटच्या एक वर्षासाठी त्यांना उपमहापौरपदाची संधी मिळाली होती.

गत काही दिवसांपासून गणेश बुधो सोनवणे हे आजारी असल्याने त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतांनाच त्यांनी आज सायंकाळी शेवटचा श्‍वास घेतला. त्यांच्या निधनामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात येत असून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound