Home क्राईम फरार गुन्हेगारास नाशिक येथून केली अटक

फरार गुन्हेगारास नाशिक येथून केली अटक


831fed20 e010 462e 8dfc fdacadd47cbf

 

 

चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील मोटारसायकल चोरी आणि अन्य प्रकरणात गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या संशयित गुन्हेगारास येथील शहर पोलिसांनी नाशिक येथून अटक केली आहे.

अधिक माहिती अशी की, येथील शहर पो.स्टे. अंतर्गत विविध गुन्ह्यांमध्ये हवा असलेला आणि गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या राजेंद्र किसन परदेशी (रा. जामडी) यास पो.उ.नि. घोळवे, हे.कॉ. भोसले, पो.कॉ. गोवर्धन बोरसे, गोपाल बेलदार, तुकाराम चव्हाण, अभिमन पाटील व राहुल पाटील यांनी वरीष्ठांच्या मार्गदर्शनानुसार नाशिक येथे सापळा रचून अटक केली असून त्याला चाळीसगाव येथे आणले आहे. त्याच्यावर येथे बरेच गुन्हे दाखल आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound