जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर जळगावकरांनी तीन दिवसांच्या जनता कर्फ्यूचे पालन करावे असे आवाहन शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी प्रसिध्दीपत्रान्वये कळविले आहे.
आमदार भोळे सांगितले की, कोरोनाच्या सुरूवातीच्या काळात लॉकडाऊनला नागरीकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे जळगाव शहरातील रूग्ण संख्या कमी होती. परंतू आता कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे रूग्णांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाचे १२, १३ आणि १४ मार्च रोजी तीन दिवसांचा जनता कर्फ्यूचे आदेश पारित केले आहे. तरी जळगावकरांनी शासकीय नियमांचे तंतोतंत पालन करून जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन यांना सहकार्य करावे, जेणे करून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल असे आवाहन आमदार राजूमामा भोळे यांनी केले आहे.