बोदवड प्रतिनिधी । आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याने बोदवड तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठी आठ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याने बोदवड तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठी सुमारे ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून खिरोदा – चिनावल – वडगाव-निंभोरा-बलवाडी-बोदवड (वळण रसत्यासह) जामठी-नांद्रा-हवेली-फत्तेपूर-तोंडापूर-वाकोद रस्ता राज्य मार्ग ४६ वरील मोरी बांधकामासह सुधारणेसाठी २ कोटी २७ लाख मंजूर करण्यात आले आहेत.
उर्वरित रस्त्यांमध्ये वरणगाव, भानखेडा, मुक्तळ, जलचक्र, बोदवड, मनूर बु., धोंडखेडा ते जिल्हा हद्द रस्ता प्रजिमा २८साठी १ कोटी ८७ लाख; जामठी, लोणवाडी, धोंडखेडा हरणखेड, कोल्हाडी रस्त्यासाठी अंदाजे १ कोटी २० लाख. कोल्हाडी, निमखेड रामा २७० ते हरणखेड, चिखली, मनुर खुर्द ते रामा ४६, शेलवड रस्त्यावरील मोरी बांधकामासह अन्य कामांसाठी सुमारे १ कोटी २० लाख; कोल्हाडी, निमखेड रामा २७० ते हरणखेड, चिखली, मनूर खुर्द ते रामा ४६, शेलवड रस्ता रुंदीकरण व हरणखेड गावानजीक संरक्षक भिंत बांधकामासाठी सुमारे १ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. तसेच कोल्हाडी, निमखेड रामा २७० ते हरणखेड, चिखली, मनुर खु., ते रामा ४६ ते शेलवड रस्त्यावरील पुलाचे बांधकाम करण्यासह अन्य कामांसाठी ४४ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी हा निधी मिळाला असून यामुळे बोदवड तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्न सुटणार आहे.