भुसावळ प्रतिनिधी । तरूणाला मारहाण करून त्याच्याकडून मोबाईल हिसकावून घेतल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आले असून यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.
याबाबत वृत्त असे की, सुंदर नगराजवळ तरुणाला मारहाण करून ३० हजार रूपये आणि मोबाइल हिसकावल्याची घटना ६ मार्चला घडली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी तिघांना अटक केली. यात मो. सोहेल मो. इसाक (वय २१, रा.मुस्लीम कॉलनी, इदगाहच्या पाठीमागे), फरहान रोशन खान (वय २२, मोहंमदी नगर, अलहिरा स्कूलजवळ) व सोमेश दिलीप तावरे (वय २२, लक्ष्मीनगर, रिंग रोडजवळ, भुसावळ) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. तर यामध्ये अजून एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे.
त्यांच्याकडून लुटीतील मोबाइल, डेबिट कार्ड, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी तसेच लुटीतील मोबाइल व डेबीट कार्ड जप्त केले आहे. ही कारवाई डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, सहायक अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हरीष भोये, अनिल मोरे, गणेश धुमाळ, मंगेश गोंटला यांच्यासह रवींद्र बिर्हाडे, रमण सुरळकर, योगेश चव्हाण, गजानन वाघ, सुभाष साबळे, प्रशांत परदेशी यांच्या पथकाने केली आहे.