Home आरोग्य जनता कर्फ्युचे पालन करण्याचे पालकमंत्र्याचे आवाहन

जनता कर्फ्युचे पालन करण्याचे पालकमंत्र्याचे आवाहन

0
38
gulabrav patil


जळगाव प्रतिनिधी । कोरोनाची संपर्क साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि जनता कर्फ्युचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

जळगाव शहरातील व्यापारी आणि स्वंयसेवी संस्थांनीदेखील प्रशासनास सहकार्य करावे. कोरोना साखळी तोंडणे आणि संसर्ग कमी करणे ही आपली सर्वांची जबाबदारी असून त्यादृष्टीने जनता कर्फ्युचे पालन करणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हा प्रशासनालादेखील सूचना देण्यात आलेल्या आहेत. नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करुन कोरोनाच्या विरुध्दच्या या लढ्यात आपला सहभाग नोंदवावा, असे पालकमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

 


Protected Content

Play sound