हैदराबादमधील निझामाबाद मतदारसंघात बॅलेट पेपरवर होणार मतदान

vote

 

हैदराबाद (वृत्तसंस्था) तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या के. कविता निझामाबादमधून निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या आहेत. मात्र, चंद्रशेखर राव यांच्या सरकारवर रोष असल्याने १७५ शेतकऱ्यांनी त्यांच्याविरोधात अर्ज भरला आहे. त्यामुळे इतक्या उमेदवारांसाठी ईव्हीएम मशीनवर मतदान घेता येणे शक्य नसल्यामुळे निवडणूक आयोगाने याठिकाणी बॅलेट पेपरवर मतदान होणार आहे. दरम्यान, १९९६ नंतर तेलंगणात पहिल्यांदाच बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान घेतले जात आहे.

 

निझामाबाद मतदारसंघात चार मतदान यंत्रे एकत्र जोडली तरी एकावेळी फक्त ६४ उमेदवारांसाठी मतदान घेता येऊ शकते. मात्र, निझामाबादमध्ये १८५ उमेदवारी उभे असल्याने पेच निर्माण झाला होता. अखेर निवडणूक आयोगाने याठिकाणी बॅलेट पेपरद्वारे निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी येत्या १० दिवसांमध्ये १५ लाख मोठ्या आकाराच्या मतपत्रिका छापण्यात येतील. तसेच या मतपत्रिका ठेवण्यासाठी मतपेट्याही मागवण्यात आल्या आहेत. दरम्यान, सध्या तेलंगणा राष्ट्र समितीकडून शेतकऱ्यांनी उमेदवारी मागे घ्यावेत, यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, बहुतांश शेतकऱ्यांनी उमेदवारी मागे घेण्यास नकार दिला. आश्वासनानुसार हळदीला योग्य भाव न दिल्यामुळे ही परिस्थिती ओढावली आहे.

Add Comment

Protected Content