Home Cities चोपडा नूतन शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिवपदी जवरीलाल जैन यांची बिनविरोध निवड

नूतन शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिवपदी जवरीलाल जैन यांची बिनविरोध निवड

0
29


 

चोपडा, प्रतिनिधी । तालुक्यातील घोडगाव येथील नूतन शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव भिका पोपट पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या सचिवपदी जवरीलाल जैन यांचीबिनविरोध निवड करण्यात आली. 

शुक्रवार दि. ५ मार्च रोजी संस्थाध्यक्ष चंद्रहास गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीचे आयोजन करण्यात आली होते. या बैठकीत जवरीलाल जैन यांची सचिवपदी  तसेच  विधी सल्लागारपदी  पी. एच. महाजन तर सभासद म्हणून निंबा महादू पाटील यांची सन २०१८ ते २०२३ च्या कार्यकारणीत बिनविरोध निवड करण्यात आली. या बैठकीमध्ये झालेल्या निवडीचे अध्यक्ष चंद्रहास गुजराथी ,उपाध्यक्ष द्रविलाल पाटील, सहसचिव भानुदास पाटील व कार्यकारी मंडळाने अभिनंदन केले आहे.

 


Protected Content

Play sound