Home आरोग्य पाचोरा ग्रामीण रुग्णालयात ५७ नागरिकांनी घेतली लस

पाचोरा ग्रामीण रुग्णालयात ५७ नागरिकांनी घेतली लस

0
30

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा येथे ग्रामिण रुग्णालयात दि. २ मार्च रोजी सकाळ पासुनच कोविड- १९ प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली असून आज पहिल्या दिवशी ३९ पुरुष व १८ महिलांना लसीकरण करण्यात आले. मात्र काहींना अडचणी आल्याची ओरड होत आहे.

दरम्यान, वारंवार सर्वर डाऊनची समस्या येत असल्याने वृद्धांना प्रतिक्षा करावी लागली होती. दि. २ रोजी ३९ पुरुष व १८ महिलांनी लस टोचून घेतली. लस घेणाऱ्यांमध्ये नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष शांताराम सोनजी पाटील यांनीही कोरोना प्रतिकारक लस घेतली आहे. याकामी पाचोरा ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांचे मार्गदर्शनाखाली परिचारीका ज्योत्स्ना पवार, फरिदा खान, नयना वाघ, दुर्गा तेली सह वैद्यकीय टीमने लसीकरणास सहकार्य केले.

 

 

 

 

 


Protected Content

Play sound