जळगाव , प्रतिनिधी । संजय राठोड यांचा राजीनामा घेतला गेला तसा धनंजय मुंडे यांचाच घेतला जावा या मागणीवर आम्ही आजही ठाम आहोत भाजप नरमलेली नाही , असे आज भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी सांगितले
पक्ष संघटना बांधणीच्या मुद्द्यावर स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चेसाठी आणि आढावा बैठकीसाठी उमा खापरे आज जळगावात आल्या होत्या त्यावेळी त्यांनी पत्रपरिषदेत हि भूमिका मांडली त्या पुढे म्हणाल्या कि धनंजय मुंडे यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यावर महिला आघाडीसह चंद्रकांत पाटील , देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती . शर्मा या आपल्या दुसरी पत्नी असल्याचे व त्यांच्यापासून २ मुले झाल्याचे धनंजय मुंडे यांनी जाहीरपणे मान्य केले आहे मात्र त्यांनी हि माहिती निवडणुकीविषयक कागदपत्रांमध्ये नोंदवलेली नाही म्हणून यांनी राजीनामा देऊन कायदेशीर चौकशीला सामोरे जावे या मुद्द्यावर आजही आम्ही ठाम आहोत आम्ही फक्त संजय राठोड आणि महेबूब शेख यांच्या गुन्ह्यांबद्दलच आक्रमक आहोत आणि धनंजय मुंडेंबद्दल मवाळ आहोत असे नाही .
बूथ बांधणी मजबूत करून पेज प्रमुखांची नेमणूक , त्यांना पक्षाची धोरणे जनतेत नेण्यासाठीच्या सूचना देणे व पक्ष संघटना मजबूत करतानाच समाजातील विविध क्षेत्रातील महिलांचे प्रश्न सॊडवण्यासाठी पक्षाच्या पातळीवर पुढाकार घेतला जाणे हा या दौऱ्याचा हेतू आहे . आत्मनिर्भर भारत हे उद्दिष्ट साध्य करताना महिला सक्षमीकरणासाठी सरकारच्या योजनांचे लाभ सामान्यांना मिळवून देणे अशी कामे आमच्या महिला पदाधिकारी करतील असेही त्या म्हणाल्या .
https://www.facebook.com/508992935887325/videos/464630858000786