Home Cities अमळनेर मंगळरूळ शिवारातून इलेक्ट्रिक सामानांची चोरी; अमळनेर पोलीसात गुन्हा

मंगळरूळ शिवारातून इलेक्ट्रिक सामानांची चोरी; अमळनेर पोलीसात गुन्हा


अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील मंगळरूळ शिवारातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २ लाख ३८ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना नुकतीच उघडकीला आली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील फापोरे रस्त्यावर आणि मंगळरूळ शिवारात इलेक्ट्रिक कंपनीचे सामान ठेवण्यात आले आहे. २६ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेनंतर अज्ञात चोरट्यांनी शेतात ठेवलेले ७० हजार रूपये किंमतीचे १६ एव्ही शुज, ३८ हजार ५०० रूपये किंमतीचे अल्यूमिनीअम कंडक्टर, ८० हजार रूपये किंमतीचे ट्रान्सफार्मर, दीड हजार रूपये किंमतीचे ट्रक्टर बॅटरी, ८ हजार रूपये किमतीचे लोखंडी चॅनल आणि ४० हजार रूपये किंमतीचे चक्की मोटार असा एकुण २ लाख ३८ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी लेबर कॉन्ट्रॅक्टर जितेंद्र भास्कर पाटील (वय-३०) यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि गंभीर शिंदे करीत आहे. 


Protected Content

Play sound