चाळीसगाव येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी

चाळीसगाव प्रतिनिधी । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची ६४४ वी जयंती अल्प जणांच्या उपस्थितीत रंभाई आर्ट गँलरी, देवीवाडा, संत रोहीदास काँलनी येथे जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.

राज्यात करोना संसर्गाचे संकट अद्याप हि दिसत असल्याने. सण-उत्सव कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत साजरे करण्याचे निर्देशन शासनाने दिले आहे. या पार्श्वभूमीवर संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची ६४४ वी जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. याप्रसंगी चर्मकार उठाव संघाचे राज्य अध्यक्ष मोतीलाल अहिरे यांच्याहस्ते संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. तसेच समाज बांधवांच्या वतीने  पन्नास ते शंभर दिन दुबळ्यांना एक लाखाचे विमा कवच देण्यात येईल, असे मोतीलाल अहिरे सांगितले. नगरसेवक रामचंद्र जाधव व मुकेश नेतकर यांनी संत रोहिदास महाराज यांच्या जीवनचरित्रला उजाळा दिला.

यावेळी नगरसेवक बापु अहिरे, बाबा गांगुर्डे, शिवाजी गांगुर्डे, पोपट गांगुर्डे, प्रदिप वाघ,आनंद गांगुर्डे, श्रीकृष्ण वाघ, धर्मराज खैरनार, महेंद्र सुर्यवंशी, खेमचंद कुमावत, विजय महाले, लक्ष्मण गांगुर्डे, राहुल नकवाल, खुशाल मोरे, धनराज पवार, धनराज मोरे, सागर गांगुर्डे, अशोक जाधव, मंगेश गांगुर्डे, राहुल मोरे, शुभम अहिरे,  विशाल खलाले, प्रदिप वाघ, आनंद गांगुर्डे, श्रीकृष्ण वाघ, धर्मराज खैरनार, महेंद्र सुर्यवंशी, खेमचंद कुमावत, विजय महाले, लक्ष्मण गांगुर्डे, राहुल नकवाल, खुशाल मोरे, धनराज पवार, धनराज मोरे, सागर गांगुर्डे, अशोक जाधव, मंगेश गांगुर्डे, राहुल मोरे, शुभम अहिरे, विशाल खलाणे आदी उपस्थित होते.

Protected Content