पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील आंबे वडगाव येथील विजयदादा फाऊंडेशनच्या माध्यमातून राष्ट्रसंत गाडेबाबा यांच्या जयंतीनिमित्त ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले.
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगांव तांडा येथील मुळचे रहिवासी असलेले व अंधेरी (मुंबई) येथे कार्टुन फ्लिमचे निर्माते विजय रणजीत राठोड यांनी विजयदादा युवा फाऊंडेशनच्या वतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंती निमित्त अंबे वडगाव, वरखेडी, लोहारा, कळमसरा व कुर्हाड येथे ३० ते ४० युवकांना सोबत घेऊन सोशल डिस्टंससिंगचे पालन करुन स्वच्छता अभियान राबविले.
या अभियानाचे उदघाटन आंबे वडगांव येथील महानुभाव पंथाचे ज्येष्ठ अनुयायी रवि शास्त्री वेळणकर (मोठे बाबा) यांचे हस्ते करण्यात आले. येथील महानुभाव पंथाच्या आश्रमातील श्रीकृष्ण मंदिरापासून अभियानाची सुरुवात झाल्यानंतर परिसरातील रस्ते, ग्रामपंचायत परिसर विजय राठोड, गोपाल वाघ, पितांबर महाराज, किशोर हडप, श्रीराम राठोड, राहुल राठोड, सिध्देश राठोड, अमोल पाटील, अनिल चव्हाण, योगेश चौधरी, विश्वनाथ राठोड, सोनु झेरावते, आदेश पवार, रुपेश पवार, पितांबर महाजन, वामन पवार यांनी सहभाग नोंदविला.
श्रीकृष्ण मंदिरात स्वच्छता अभियानाचे उद्घाटन झाल्यानंतर महानुभाव पंथाचे रवि शास्त्री वेळणकर (मोठे बाबा) यांनी स्वच्छता अभियानाबाबत बोलताना सांगितले की, माणसांनी भेदभाव न करता आपल्यातील अंतर्गत व बाह्य मनाची स्वच्छता करायला हवी. आराध्य दैवत श्रीकृष्ण यांचा मंत्र गोपाला-गोपाला हा घेऊन स्वच्छता मोहीम राबवली होती. श्रीकृष्ण यांनी द्वापार युगात हे अभियान चालविले होते. त्या काळात अहंकारी वृत्तीच्या लोकांचे आपल्या कलेने त्यांचे अहंकार उजळुन शुध्द केले होते. संत गाडगेबाबा यांचे विचार आचरणात आणुन प्रत्येकाने आपले घर, परिसर व गाव स्वच्छ ठेवल्यास कोरोना सारख्या महामारीला थारा मिळणार नसुन त्यांनी विजय राठोड यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
विजयदादा युवा फाऊंडेशनच्या माध्यमातून ३० ते ४० युवकांना टी शर्ट, हॅण्ड ग्लोव्हज, फेस शिल्ड व सॅनिटायझरचा वापर करत सोशल डिस्टंससिंग पाळुन अभियान राबविण्यात आले. यात राहुल राठोड, अमोल राठोड, अनिल चव्हाण, आकाश राठोड, सोनु शेरे, नितीन राठोड, सचिन शेरे, वामन पवार, विशाल जाधव, अश्रि्वन पवार, सतिष पवार, दिनकर चव्हाण यांच्यासह गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांनी सहभाग नोंदविला.