Home क्राईम पिंप्राळा हुडको परिसरात विवाहितेचा विनयभंग; एकावर गुन्हा

पिंप्राळा हुडको परिसरात विवाहितेचा विनयभंग; एकावर गुन्हा


जळगाव प्रतिनिधी ।  शहरातील पिंप्राळा परिसरात राहणाऱ्या विवाहितेला अश्लिल शब्द व हावभाव करत विनयभंग करणाऱ्या सुरेश बंडु वाघ (वय-४२) रा. पिंप्राळा हुडको याच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात राहणारी १९ वर्षीय विवाहितेला राहत्या गल्लीतील संशयित आरोपी सुरेश बंडु वाघ (वय-४२) विवाहितेच्या घरासमोर अंगणात उभा राहून विवाहितेकडे पाहून अश्लिल हावभाव केले. तसेच अश्लिल अपशब्द बोलून विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना गुरूवारी  रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सुरेश वाघ याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार गोपाळ चौधरी करीत आहे. 


Protected Content

Play sound