Home Uncategorized पहूर कसबे सोसायटीच्या चेअरमनपदी ज्ञानेश्वर करवंदे

पहूर कसबे सोसायटीच्या चेअरमनपदी ज्ञानेश्वर करवंदे

0
41

 

पहूर, जामनेर, प्रतिनिधी   पहूर कसबे वि.का.सोसायटी चेअरमनपदी क्षत्रिय माळी समाज संघटना अध्यक्ष ज्ञानेश्वर  संपत करवंदे यांची तर व्हा. चेअरमनपदी प्रकाश सहादू लहासे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

विद्यमान चेअरमन नामदेव विठ्ठल सोनवणे व व्हा. चेअरमन अशोक मधुकर घोंगडे यांनी राजीनामा दिल्यामुळे ही पदे रिक्त झाली होती.वि. का. सोसायटीच्या संचालक मंडळाची बैठक झाली .यावेळी चेअरमनपदी ज्ञानेश्वर करवंदे तर व्हा. चेअरमनपदी प्रकाश सहादू लहासे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी. व्ही. पाटील यांनी काम पाहिले. यावेळी नवनियुक्त  चेअरमन व व्हा. चेअरमन यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जि. प.कृषी सभापती प्रदिप लोढा, उपसरपंच शाम सावळे, महात्मा फुले पतसंस्थेचे संस्थापक अथ्यक्ष विवेक जाधव, डाॅ. जितेंद्र घोंगडे, योगेश बनकर, ईश्वर बनकर, गोविंदा घोंगडे, मधुकर पवार, अशोक जाधव, दिनकर पवार, बाळू जाधव, आशिष माळी, रवी जाधव, अक्षय तेले, विनोद क्षीरसागर, ईश्वर घोंगडे, विनोद थोरात, विक्रम जाधव, भीमराव जाधव,बालु सरुडकर,शिवाजी राऊत यांच्यासह सेक्रेटरी विश्वनाथ सावळे, चंद्रकांत जाधव, प्रदिप साखरे यांनी अभिनंदन केले आहे.

 

 


Protected Content

Play sound