Home Cities चाळीसगाव चाळीसगाव तहसील कार्यलयात पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी

चाळीसगाव तहसील कार्यलयात पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी

0
34

 

चाळीसगाव, प्रतिनिधी । गेल्या पंधरा दिवसांपासून शहरात कोरोनाचा कहर पुन्हा दिसू लागला आहे. या पार्श्वभूमीवर मोजक्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत तहसीलदार यांनी  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिवजयंती उत्साहात आज साजरी केली.

शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना आटोक्यात आला म्हणून सर्वंच जण बिनधास्त झाले‌ले असताना आता कोरोनाची दुसरी लाट पहायला मिळत आहे. गेल्या पंधरा दिवसांत कोरोना बाधीतांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन तहसीलदार अमोल मोरे यांनी चार-पाच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत प्रतिमेला पुष्पहार अर्पण व अभिवादन करून शिवजयंती उत्साहात साजरी केली. पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे प्रत्येकाने नियमांचे पालन करा व तोंडावर मास्क लावल्याशिवाय घरातून कोणीही बाहेर निघू नये असे आवाहन तहसीलदार अमोल मोरे यांनी केले.

 


Protected Content

Play sound