Home Cities जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

0
35

 

जळगाव, प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यालयात अभिवादन करण्यात आले. 

अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी कार्यालय अधीक्षक ए.यु. शिरसाठ, औषधवैद्यक शास्त्राचे डॉ. विजय गायकवाड, बधिरीकरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संदीप पटेल, डॉ. सतीश सुरळकर, स्वीय सहाय्यक दिलीप मोराणकर, विनय सावंत, गोपालसिंग सोळंकी, स्वच्छता निरीक्षक बापू बागलाणे, मोहन पाटील, दगडू भारसके उपस्थित होते.

 

 


Protected Content

Play sound