Home धर्म-समाज हरितक्रांती योजने अंतर्गत झालेल्या वृक्ष लागवडीची चौकशी करण्याची मागणी

हरितक्रांती योजने अंतर्गत झालेल्या वृक्ष लागवडीची चौकशी करण्याची मागणी

0
19

यावल प्रतिनिधी । नगर पालिकेतर्फे शहरात विविध ठिकाणी हरित क्रांती योजनेअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मात्र, संबंधित ठेकेदारांकडून रोपांवर दुर्लक्ष होत असून शासनाच्या अटीशर्तीचा भंग केल्याप्रकरणी ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी यावल नगर परिषदेच्या उपनगरध्यक्षा रूखमाबाई महाजन यांनी मुख्याधिकारी बबन तडवी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे नुकतीच केली आहे. 

याबाबत निवेदनात नमुद करण्यात आहे की,यवाल नगर पालिकेतर्फे यावल शहरात विविध थीकानि हरित क्रांती योजनेतून वृक्षारोपणा ची प्रत्यश पहाणी केली असता ठेकेदाराकडून निवेदे प्रमाणे जे वृक्ष लागवडी साठी दिले आहे.ते लावता दुसरेच वृक्ष लागवड करण्यार आहे आहे तसेच संगोपनासाठी देऊन जबाबदारी सोपवली आहे. मात्र, शहरात काही भागात लावलेली रोपे हिवाळ्यात सुकू लागली आहेत. त्यामुळे पालिकेने खर्च केलेला निधी वाया जाण्याची शक्यता आहे. याप्रकरणी सुकलेल्या रोपांचे फोटो घेऊन उपनगराध्यक्षा भालेराव महाजन यांनी थेट मुख्याधिकारी बबन तडवी यांच्याकडे तक्रार केली आहे. याबाबत योग्य चौकशी

करून वृक्षरोपण व संगोपनात निष्काळजीपणा दाखवणाऱ्या संबंधित मक्तेदारावर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. त्याच्यावर कारवाई न केल्यास नगर पालिकेसमोर उपोषणाचा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी सामाजीक कार्यकर्ते गणेश महाजन, उपस्थित होते.संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी उपनगरध्यक्षा रूखमाबाई भालेराव महाजन यांनी केली आहे.

तात्काळ कारवाइ न केल्यास उपोषणाचा इशारा त्यांनी दिला आहे.पालिकेने हरित क्रांती योजनेतून शहरात, रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षरोपण केले. लावलेल्या रोपांच्या संगोपनासाठी मक्तेदारांना अडीच हजार रूपये एका रोपाच्या लागवडीसाठी देण्यात आले असुन शहरात विविध ठीकाणी सुमारे एक हजार वृक्षांची लागवडीचा कार्यक्रम राबऱ्यात येत असुन तो शेवटच्या टप्यात आहे.

 


Protected Content

Play sound