Home क्राईम मेहरूण परिसरातून तरूणाची दुचाकी लांबविली; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

मेहरूण परिसरातून तरूणाची दुचाकी लांबविली; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

0
36


जळगाव प्रतिनिधी । शहरातील खान्देशमिल परिसरात राहणाऱ्या तरूणाची दुचाकी मेहरूण परिसरातून अज्ञात भामट्याने चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, प्रतीक मनिष शेठ (वय-३५) रा. खान्देश मिल कॉलनी दत्त कॉलनी रिंगरोड हे कामाच्या निमित्ताने १४ फेब्रुवारी रोजी ३.५० वाजता शहरातील मेहरूण परिसरातील स्वीमिंग टॅन्क येथे दुचाकी (एमएच १९ बीडब्ल्यू ८०१०) ने गेले. दुचाकी विद्या इंग्लिशी मिडीयम स्कूलच्या बाजूल आलेल्या जैन स्पोटर्स समोर  गेटजवळ लावली. सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घरी जाण्यासाठी गेले असता त्यांना दुचाकी जागेवर आढळून आली नाही. परिसरातही शोधाशोध केली परंतू दुचाकी मिळाली नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राजपूत करीत आहे. 


Protected Content

Play sound