लोणी खुर्द येथे चोरट्यांनी घर फोडले; सोन्याचांदीच्या दागिन्यांची चोरी, पारोळा पोलीसात गुन्हा

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील लोणी येथील एकाचे बंद घर फोडून घरातील सोन्या दागिने असा एकुण ७२ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, राजू बाबुलाल पाटील (वय-५२) रा. लोणी खुर्द ता. पारोळा जि.जळगाव हे कामाच्या निमित्ताने १६ फेब्रुवारी सकाळी १० वाजता परिवारासह बाहेरगावी गेले होते. १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता घरी आले तेव्हा घराचे कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि रविंद्र बागुल करीत आहे. 

Protected Content