रावेर प्रतिनिधी । जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील यांनी आज रावेर पंचायत समितीला सरप्राईज व्हिजीट दिली असून त्यांनी नविन इमारतीची पाहणी करून जनतेची कामे वेळेत करण्याच्या सूचना दिला आहेत. यावेळी बिडिओ दिपाली कोतवालसह इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी त्यांनी नव्याने बांधकाम झालेल्या सर्व विभागाची पाहणी केली. अधिकारी कर्मचारी यांना ग्रामीण भागातुन येणाऱ्या लोकांची कामे वेळेवर झाली पाहिजे. तसेच इतर कामांविषयी उपस्थित सर्वांना सूचना केल्या. यावेळी भाजपाध्यक्ष राजन लासुरकर, प.स. सदस्य जितू पाटील गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल, विस्तार अधिकारी डी.एस. सोनवणे, संदानशिव यांच्यासह आदी उपस्थित होते.
अपघातात मयताच्या कुटुंबाचे केले सांत्वन
दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील यांनी पंचायत समिती भेट नंतर किनगाव नजिक अपघातात मृत्यू झालेल्या आभोडा, विवरा, केऱ्हाळा ता.रावेर येथील कुटुंबांचे सांत्वन केले व शासना मयत परिवाराला जास्तीत-जास्त मदत करण्याची मागणी केली. यावेळी त्यांच्या सोबत पाटील, रावेर सभापती कविता कोळी, उप सभापती धनश्री सावळे, पं.स.सदस्य योगिता वानखेडे, विवरा सरपंच युवराज भालेराव, वासू नरवाडे आदी होते.