पुणे वृत्तसंस्था । (pune) माजी न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांचं आज सकाळी निधन झालं. त्यांनी आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. ते ९१ वर्षांचे होते. पुण्यातील बाणेर येथे मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पी.बी.सावंत यांचं आज सकाळी साडेनऊ वाजता त्यांच्या पुण्यातील राहत्या घरी निधन झालं. ३० जून १९३० रोजी पी.बी. सावंत यांचा जन्म झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली. त्यानंतर सावंत यांनी उच्च न्यायालयात आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सराव सुरू केला. १९७३ मध्ये सावंत यांची उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी १९८२ मध्ये एअर इंडियाच्या विमान अपघाताची चौकशीही केली. त्यानंतर १९८९ मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली. १९९५ मध्ये ते सेवानिवृत्त झाले.
पुण्यातील पहिली एल्गार परिषद ही पी.बी.सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती.