यावल आयुब पटेल । धुळे जिल्ह्यातील पपई भरून येणारे आयशर तालुक्यातील किनगाव येथून जात असतांना अपघात होवून आयशर पटली झाला. यात अपघातात १३ मजूरांसह २ बालकांचा मृत्यू झाला. मयताचे मृतदेहावर यावल ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच यावल-रावेर तालुक्याचे आमदार शिरीषदादा चौधरी यांनी भेटदेवून माहिती जाणून घेतली.
मयतांच्या वारसांना तातडीने मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मिळावी यासाठी पाठपूरावा सुरू आहे. तसेच अशा मजूरांचा एकत्रित विमा कसा काढता येईल याबाबत तालुका प्रशासनाला प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना देण्यात आले आहे. दरम्यान मुख्य शहरांना जोडणारा रस्त्यावर मोठ्याप्रमाणावर खड्डे पडले आहे. याबाबतीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्पुरत्या स्वरूपात रस्ता दुरूस्तीची कामे लवकरात लवकर करणार असल्याचे आश्वासन यावेळी आमदार चौधरी यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.