Home Cities यावल स्व. हरीभाऊ जावळे यांच्या कुटुंबियांचे ना. जयंत पाटील यांनी केले सांत्वन

स्व. हरीभाऊ जावळे यांच्या कुटुंबियांचे ना. जयंत पाटील यांनी केले सांत्वन

0
57

यावल Yawal प्रतिनिधी । भाजपचे दिवंगत जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार व आमदार हरीभाऊ जावळे यांच्या भालोद येथील निवासस्थानी आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. पक्षीय राजकारणाच्या पलीकडचा हा स्नेहाचा ओलावा हरीभाऊ जावळे यांच्या सर्वसमावेशक व्यक्तीमत्वाच्या आठवणींना उजाळा देऊन गेला.

भाजपचे दिवंगत जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार व आमदार हरीभाऊ जावळे (Haribhau Jawle) यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत सर्वपक्षीय संबंध जोपासले होते. विविध पक्षाच्या नेत्यांशी त्यांचे अतिशय आपुलकीचे संबंध होते. याच प्रकारे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशीही त्यांचा स्नेह होता. याच स्नेहाचा ओलावा आज पहायला मिळाला.

राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद यात्रेनिमित्त ना. जयंत पाटील (Jayant Patil ) हे जळगाव जिल्हा दौर्‍यावर आहेत. त्यांनी चोपडा येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर थेट भालोद गाठून दिवंगत हरीभाऊ जावळे यांच्या कुटुंबियांचे भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांनी हरीभाऊंच्या आठवणींना उजाळा देत त्यांचे कार्य अजरामर असल्याचे सांगितले. त्यांनी हरीभाऊंच्या पत्नी कल्पनाताई व पुत्र अमोल जावळे यांच्याशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. पक्षीय राजकारणाच्या पलीकडचा हा स्नेहाचा ओलावा हरीभाऊ जावळे यांच्या सर्वसमावेशक व्यक्तीमत्वाच्या आठवणींना उजाळा देऊन गेला.

याप्रसंगी ना. जयंत पाटील यांच्यासोबत माजी मंत्री एकनाथराव खडसे, आमदार अनिल पाटील, माजी आमदार मनीष जैन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, महानगरअध्यक्ष अभिषेक पाटील, जळगाव शहर अध्यक्ष स्वप्नील नेमाडे, सरचिटणीस सुशील शिंदे यांची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound