राज्यातील आणखी एक मंत्री गोत्यात; तरूणीच्या आत्महत्येने संशयकल्लोळ !

 

 

मुंबई प्रतिनिधी । सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील एका तरूणीच्या आरोपांनी उडालेली खळबळ शांत होत नाही तोच राज्य सरकारमधील एका मंत्र्यांशी सलगी असणार्‍या तरूणीच्या आत्महत्येमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

 

धनंजय मुंडे यांच्यावर एका तरूणीने शोषणाचा आरोप केल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी सामोपचाराची भूमिका घेण्यात आल्याने मुंडे यांचे मंत्रीपद बचावले. आता मात्र राज्य सरकारमधील आणखी एक मंत्री गोत्यात आला आहे. मूळची बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील रहिवासी असणार्‍या पूजा लहू चव्हाण या २२ वर्षाच्या युवतीने दोन दिवसांपूर्वी केलेली आत्महत्या ही राज्य सरकारमधील एका मंत्र्याकडे अंगुलीनिर्देश करणारी ठरल्याने खळबळ उडाली आहे.

 

विदर्भातील मंत्री असणार्‍या एका राजकारण्याशी पूजा चव्हाण हिची सलगी असल्याची चर्चा होती. यातच तिने पुण्यात आत्महत्या केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. तर तिच्या मृत्यूशी संबंधीत काही ऑडिओ क्लीप्स सोशल मीडियात व्हायरल झाल्या असून यामधील संभाषणामुळे संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. या तरूणीच्या कुटुंबियांनी कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल केली नाही ही बाब विशेष आहे. तर, भाजपने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Protected Content