जळगाव प्रतिनिधी । शहरातील नवीपेठ येथील सुगोकी स्वीटमार्टजवळून तरुणाची २ हजार रुपये किंमतीची सायलक चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
रामानंद नगर येथील हार्दिक भरत तुरखीया वय २९ हा तरुण खाजगी कंपनीत नोकरीला आहे. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता हार्दिक त्याच्या वैयिक्तक कामासाठी सायकलीवरुन शहरातील नवीपेठेत आला. सुगोकी स्वीटमार्ट जवळ त्याने त्याची सायकल उभी केली. यानंतर काम आटोपून सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास परतल्यावर सायकल दिसून आली नाही. सर्वत्र शोध घेवूनही सायकल मिळून न आल्याने हार्दिक तुरखीया याने शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीवरुन शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रफुल्ल धांडे करीत आहेत.