Home धर्म-समाज प्रणाली चिकटे यांचा कुर्हा काकोडा येथे सत्कार

प्रणाली चिकटे यांचा कुर्हा काकोडा येथे सत्कार


 

 

मुक्ताईनगर : प्रतिनिधी । पर्यावरण रक्षणाचा संदेश , क्लायमेट चेंज बद्दल जागृती , शेतीतील समस्या व त्यावर उपाय शोधण्यासाठी महाराष्ट्रभर सायकल यात्रा करीत असलेल्या प्रणाली चिकटे यांचा आज कुर्हा काकोडा येथे सत्कार करण्यात आला

 

यवतमाळ जिल्ह्यातील प्रणाली चिकटे ही एकटी निघाली आहे. 20 ऑक्टोबर 2020 पासून तिची सायकल वारी सुरू झाली आहे. ४६००  किमी पेक्षा जास्त  प्रवास करून त्यांनी खानदेश मध्ये  प्रवेश केला

कुऱ्हा काकोडा येथे  प्रणालीच्या सत्कारासाठी पं. स. सदस्य राजु सावळे, ज्ञानेश्वर ढोले, निखिल भोलाणकर, दोरकर सर, राजु सुरवाडे, भरत मदने, विनोद चौधरी व सौ वंदना चौधरी  हे उपस्थित होते.


Protected Content

Play sound