Home आरोग्य रोटरी सेंट्रलतर्फे मोफत लेसर उपचार शिबिर

रोटरी सेंट्रलतर्फे मोफत लेसर उपचार शिबिर

0
60


जळगाव प्रतिनिधी । रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलतर्फे १४ फेब्रुवारी रोजी मोफत लेसर उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलतर्फे १४ फेब्रुवारी रोजी भास्कर मार्केटजवळील शिल्प कॉस्मेटिक क्लिनिक येथे मोफत लेसर उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात डॉ. शुभा महाजन या रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत. ज्यांना जन्मखुणा, चेहर्‍यावरील डाग, व्रण, गोंदण, मुरुमांमुळे व कांजण्यामुळे डाग, स्ट्रेच मार्क, डार्क सर्कल, वांग, मानेवरील काळेपणा, चेहर्‍यावर असलेले केस कायमचे कमी करणे अशा रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. रूग्णांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन मानद सचिव जितेंद्र बरडे, मेडिकल कमिटी चेअरमन डॉ. अनंत पाटील, अध्यक्ष प्रा. डॉ. अपर्णा भट-कासार व प्रकल्प प्रमुख डॉ. राहुल मयूर यांनी केले आहे.


Protected Content

Play sound