Home क्राईम कुसुंबा येथे लग्नासाठी आलेल्या तरूणाची दुचाकी लांबविली

कुसुंबा येथे लग्नासाठी आलेल्या तरूणाची दुचाकी लांबविली

0
47


जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कुसुंबा येथे लग्नाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या भुसावळ तालुक्यातील वराड सिम येथील तरूणाची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २९ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, योगेश संजय चौधरी (वय-२४) रा.वराड सिम ता. भुसावळ, जि.जळगाव याच्या घरात लग्न असल्यामुळे हळदीच्या कार्यक्रमासाठी २९ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता तालुक्यातील कुसुंबा येथे (एमएच १९ सीएम ४४७०) क्रमांकाची दुचाकीने आले. त्यानंतर हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर बैठक हॉल येथे दुचाकी रात्री ९ वाजता पार्किंग करून लावली. दरम्यान ११ वाजता जागेवर दुचाकी दिसली नाही. दुचाकीचा परिसरात शोधाशोध केला असता मिळून आली नाही. लग्नाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मंगळवार ९ फेब्रुवारी रोजी रात्री उशीरा योगेश चौधरी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञातचोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संतोष सोनवणे करीत आहे.


Protected Content

Play sound