Home क्राईम शिवाजी नगरात सॉमिलमध्ये चोरी करणारे दोघे अटकेत; शहर पोलीसांची कारवाई

शिवाजी नगरात सॉमिलमध्ये चोरी करणारे दोघे अटकेत; शहर पोलीसांची कारवाई


जळगाव प्रतिनिधी । शिवाजी नगर आणि कानळदा रोडवरील एका सॉमिलमध्ये अज्ञात चोरट्यांनी  ३० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या दोन संशयित आरोपींना शहर पोलीसांनी गेंदालाल मिल परिसरातून अटक केली आहे. दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. 

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  सुधीर नटरवरलाल शहा (वय-५६) रा. नागेश्वर कॉलनी, महाबळ यांचे शिवाजी नगर आणि कनळदार रोडवर श्रीनाथ नावाचे सॉमिल आहे. त्याच ठिकाणी त्याचे ऑफिस व इलेक्ट्रिकसाठी लागणारे साहित्य ठेवण्यात आले आहे. शनिवारी मध्यरात्री १.३० ते २.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सॉमिलमधील तीन खोल्यांचे कुलूप तोडून इलेक्ट्रीक ॲम्पिअर, ईलेक्ट्रिक लहान मिक्सर, वायरचे बंडल, स्पिकर आणि क्लिपचा बाँक्स असा एकुण अंदाजे ३० हजार रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला होता. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपींची गोपनिय माहिती पोलीस नाईक अक्रम शेख, पो.ना. भास्कर ठाकरे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरिक्षक धनंजय येरूळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार वासूदेव सोनवणे, पोहकॉ रतन गिते, विजय निकुंभ, योगेश इंधाटे, तेजस मराठे, उमेश भांडारकर, नाशिर शेख, गणेश पाटील यांनी कारवाई करत संशयित आरोपी किरण अनिल बाविस्कर (वय-३०) आणि शंकर विश्वनाथ सांबळे (वय-२१) दोन्ही रा. गेंदालाल मिल यांना रविवारी रात्री राहत्या घरातून अटक केली. आज न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी देण्यात आली आहे.  पुढील तपास पोहेकॉ उमेश भांडारकर करीत आहे. 


Protected Content

Play sound