यावल प्रतिनिधी । यावल प्रतिनिधी । काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याप्रित्यर्थ आमदार शिरीष चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.
यावलच्या खरेदी विक्री सहकारी संघाच्या आवारात संपन्न झालेल्या शेतकरी मेळाव्या प्रसंगी तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार चौधरी यांची पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आले , यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन माजी आमदार रमेशदादा चौधरी , जिल्हा परिषद सदस्य व काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे , जिल्हा परिषद सदस्य आर .जी .नाना पाटील , कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान, मसाकाचे संचालक नितिन व्यंकट चौधरी , इंटकचे जिल्हा अध्यक्ष भगतसिंग पाटील , यावल पंचायत सामितीचे गटनेते शेखर सोपान पाटील , पंचायत समिती सदस्य सरफराज तडवी , यावलचे नगरसेवक अस्लम शेख नबी , समीर शेख मोमीन ,मारूळचे माजी सरपंच अकीलोद्दीन भाई सैय्यद , जावेद अलीसर, बोरावलचे सतिष पाटील , काँग्रेस अनुसुचित जाती महीला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकला इंगळे , ग्रामीण कॉंग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष जलील सत्तार पटेल , कॉग्रेसचे तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह, मसाकाचे संचालक अनिल पाटील , महीला कॉंग्रेसच्या तालुका अध्यक्ष शबाना तडवी, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान , खरेदी विक्री संघाचे संचालक अमोल भिरूड यांच्यासह तालुक्यातील कॉंग्रेस पक्षाचे पदाधीकारी याप्रसंगी मोठया संख्येने उपस्थित होते .