Home Cities यावल चिखली येथील तुषार फिरकेचे सीएच्या परिक्षेत यश

चिखली येथील तुषार फिरकेचे सीएच्या परिक्षेत यश

0
29

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील चिखली खुर्द येथील राहणार्‍या तुषार हेमराज फिरके याने सीएच्या परिक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे.

तुषार हेमराज फिरके याने मुंबई येथील एनसीए महाविद्यालयात पार पडलेल्या चार्टर्ड अकांउटंटच्या परिक्षेत ९७ टक्के गुण मिळवुन सिएच्या परिक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. यावल तालुका चिखली खु येथील सर्वसामान्य शेतकरी व चिखली गावाचे माजी उपसरपंच हेमराज फिरके यांच्या कुटुंबात जन्मासआलेल्या तरूणाने मिळवलेल्या चार्टर अकाउंटंट (सिए )  च्या परिक्षेत चांगले गुण मिळवुन उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळवला.त्याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे अनुसुचित जातीच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकलाताई इंगळे यांच्यासह ग्रामस्थानी तुषार फिरके यांचे कौतुक केले आहे.

 


Protected Content

Play sound