Home क्राईम घाट रोड परिसारातून चोरट्यांनी लांबवली दुचाकी

घाट रोड परिसारातून चोरट्यांनी लांबवली दुचाकी


चाळीसगाव प्रतिनिधी ।  शहरात चोरीचे सत्र सुरूच असताना आज घाटरोड बाराभाई मोहल्ला येथून सकाळी पहाटे २ वाजेच्या सुमारास घरासमोर उभी असलेली दुचाकी एका अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून चोरटा सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेला आहे.

सत्तार खान बाबर खान (बाराभाई मोहल्ला, चाळीसगाव) यांच्या मालकीची स्प्लेंडर प्लस ब्लॅक ऑरेंज कलरची मोटर सायकल क्रमांक (MH 43 Q 1894) घरासमोरून अज्ञात चोरट्याने पहाटे २ वाजता चोरून नेली. मात्र चोरटा हा सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झालेला आहे. चोरट्यांनी तोंडाला रूमाल बांधलेला असून मोटरसायकल घेऊन जाताना तो सीसीटीव्हीत दिसत आहे. 

घाट रोड परिसरात मागील काही दिवसांपासून चोऱ्यांचे सत्र वाढलेले आहे. पुन्हा आज हि घटना घडल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. गेल्या वीस-पंचवीस दिवसापूर्वी गणेश किराणा हे दुकान चोरट्यांनी मागील बाजूने भिंतीला भगदाड पाडून फोडले होते. त्याबाबतीत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा देखील दाखल करण्यात आला. मात्र अजून पर्यंत काहीएक तपास लागलेले नाही. त्यामुळे घाटरोड परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या अज्ञात चोरट्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली जात आहे. शहर पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू असणार आहे.


Protected Content

Play sound