Home न्याय-निवाडा खंडणी प्रकरणात दोघांना पोलीस कोठडी

खंडणी प्रकरणात दोघांना पोलीस कोठडी

0
36

भुसावळ प्रतिनिधी । गावठी कट्टयाने तरूणाला धमकावून खंडणी मागितल्याच्या प्रकरणात दोघा संशयितांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, रेल्वे स्थानकाबाहेरील पार्किंगमधील तरुणास गावठी कट्ट्याचा धाक दाखवत मारहाण करून खंडणीपोटी हप्ता मागितल्याप्रकरणी, हंसराज खरात व अमोल श्याम खिल्लारे उर्फ चिन्ना यांना अटक करण्यात आल्यानंतर ३ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीचे आदेश न्यायालयाने दिले. तर, शहर हद्दीत दरोड्याच्या गुन्ह्यातील संशयित विल्सन जोसेफ, राकेश बारे, भूषण मोरे, सागर पारधे व ऑस्टीन रामटेके यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

सरकारतर्फे अ‍ॅड.ए.ए.चुकेवाड तर संशयितांतर्फे अ‍ॅड.सत्यनारायण पाल यांनी काम पाहिले.


Protected Content

Play sound