ड्राय डे असूनही मद्यविक्री; दोघांविरूध्द गुन्हा

भुसावळ प्रतिनिधी । महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त ड्राय डे असूनही मद्य विक्री करणार्‍या दोघांविरूध्द सहायक पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या पथकाने कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत वृत्त असे की, वरणगाव रोडवारी हॉटेल सायलीवर ड्राय डे असूनही मद्यविक्री होत असल्याची गुप्त माहिती सहायक पोलिस अधीक्षक चांडक यांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी हॉटेलवर डमी ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर चांडक यांनी पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे यांनी पोलिस कर्मचार्‍यांसोबत छापा टाकला. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी अक्षय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीवरून पिटर कलमेट अ‍ॅँथोनी (रा. पंधरा बंगला) व देवीदास सोपान भारंबे (रा. त्रिमुर्तीनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content