Home क्राईम रावेर येथे जुगार अड्डयावर धाड; पाच अटकेत

रावेर येथे जुगार अड्डयावर धाड; पाच अटकेत

0
58

रावेर प्रतिनिधी । येथे रावेर पोलिसांनी पत्त्याच्या अड्ड्यावर धाड टाकून सुमारे त्रेपन्न हजाराचा ऐवज जप्त करून पाच जणांना अटक केली आहे.

याबाबतचे वृत्त असे की आज रोजी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांना गोपनीय माहिती मिळाल्या नुसार वाकोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी पाळदे ,उपनिरीक्षक श्री शेख, पोलीस श्री शेख ,श्री तायडे ,ओमप्रकाश सोनी ,विकास पोहेकर ,संदीप पाटील, मंदार पाटील, निलेश चौधरी, जाकिर पिंजारी आदींनी आज दुपारी एक वाजेच्या सुमारास शहरातील धान्य मार्केट च्या मागील बाजूस भगवती नगर परिसरातील शेताच्या बांधावर वरील झाडाखाली पत्त्याच्या अड्ड्यावर झन्ना-मन्ना नावाचा खेळ खेळत असताना पोलिसांनी धाड टाकून रोख रक्कम ४३ हजार २४० रुपये, तसेच १० हजार ५०० रुपये किमतीचे चार मोबाईल संच पोलिसांनी जप्त केले.

याप्रकरणी रवींद्र दिनकर पाटील, अनिल दत्तू चौधरी ,शेख नजीर शेखर रशिद ,विकास विकास यशवंत सैन्यास सर्व राहणार रावेर व मेहमूद खान उस्मान खान राहणार रसलपूर यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे व पोलिस करीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound