मुंबई : वृत्तसंस्था । ठाकरे सरकारमधील मंत्री विश्वजीत कदम यांच्या पत्नी स्वप्नाली कदम यांना ईडीची नोटीस आल्याची माहिती आहे. आज त्या ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यासाठी ईडीने त्यांना समन्स बजावण्यात आलं होतं, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. स्वप्नाली यांचे वडील अविनाश भोसले यांच्या मालमत्ता प्रकरणी स्वप्नाली यांची चौकशी होणार आहेत.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांना ईडीने नोटीस पाठवली होती. त्यानंतर आता ईडीच्या रडारवर काँग्रेसही असल्याचं बोललं जातंय. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीने नोटीस पाठवली होती. ईडीने त्यांची प्राथमिक चौकशीही केली आहे.
राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी ईडी नोटीसीवर बोलण्यास नकार दिलेला आहे. यासंदर्भात मला कल्पना नसल्याचं स्पष्ट करत सध्या यावर मी बोलणार नसल्याचं विश्वजीत कदम यांनी स्पष्ट केलं.
ठाकरे सरकारमधील मंत्री आणि काँंग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्या स्वप्नाली या पत्नी आहेत काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या सूनबाई आहेत.. तसंच पुण्यातले प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांच्या त्या मुलगी आहेत.
अविनाश भोसले यांची २७ नोव्हेंबर २०२० रोजी ईडीने सुमारे दहा सात चौकशी केली. फेमाँ कायद्यांतर्गत ही चौकशी करण्यात आली होती. यापूर्वीही आयकर विभागाने भोसले यांच्या घरावर छापा मारला होता. भोसले यांच्या पुणे आणि मुंबईतील २३ ठिकाणांवर आयकर विभागाने धाडी मारल्या होत्या.
अविनाश भोसले यांना ओळखणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ते ८० च्या दशकात रिक्षा चालवत होते. त्यानंतर त्यांचा बांधकाम व्यवसायाशी संबंध आला आणि ते सरकारी कंत्राटदार बनले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. आज ते कोट्यवधी रुपयांच्या एबीआयएल ग्रुपचे मालक आहेत. पुण्यात त्यांना रिअल इस्टेट किंग म्हणून ओळखले जाते.
पुण्याच्या बाणेर येथे भोसले यांचा पॅलेस आहे. व्हाईट हाऊस असं त्याचं नाव आहे. सफेद रंगाच्या या पॅलेसचा लूक अमेरिकेच्या व्हाईट हाऊस सारखाच आहे.