Home राजकीय हिंमत असेल तर लोकसभा लढवा; पंकजा मुंडेंचं धनंजय मुंडेंना आव्हान

हिंमत असेल तर लोकसभा लढवा; पंकजा मुंडेंचं धनंजय मुंडेंना आव्हान



बीड (वृत्तसंस्था) आणखी एक दिवस उमेदवारी अर्ज भरायला बाकी आहे, तर तुम्ही स्वतः मैदानात उतरा आणि जनता कोणाच्या मागे आहे, हे बघा, अशा शब्दात महिला आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंना प्रचार सभेत जाहीर आव्हान दिले आहे.

 

बीडमध्ये रॅली काढून विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यानंतर बीड शहरातील माने कॉम्प्लेक्सजवळ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या. पंकजा पुढे म्हणाल्या की, राज्याचे नेतृत्व करतो, असे म्हणणारे मागच्या दाराने येतात, स्वतः मात्र निवडणूक लढवत नाहीत, इतरांना पुढे करतात, असे म्हणत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचे आव्हान दिले. मी वडिलांचा गड बांधला, त्यांनी चौथरा तरी बांधला का? असा सवालही पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound