पाणंद फाउंडेशन व नूतन मराठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर (व्हिडिओ )

 

जळगाव, प्रतिनिधी । पाणंद फाउंडेशन व नूतन मराठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात दुपारपर्यंत जवळपास ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.

रक्तदान शिबिराचे उद्घाटन महापौर सौ. भारती सोनवणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख, मनपा उपायुक्त प्रशांत पाटील, यांच्या हस्ते करण्यात आले. पाणंद फाउंडेशन हे नूतन मराठा महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केले असून या फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनास फाउंडेशनतर्फे प्रतिसाद सामाजिक बांधिलकी जपत  रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थापक अध्यक्ष दिलीप बारी, अध्यक्ष अमीन तडवी, उपाध्यक्ष हर्षल पाटील, सचिव पंकज नहाले, खजिनदार शशिकांत फेगडे, प्रा. साहेबराव पडलवार आदींचे सहकार्य लाभले. शिबीरास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढी विभागाचे सहकार्य लाभले.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/162068972115086

Protected Content