Home राजकीय उत्तर मुंबईमधून उर्मिला मातोंडकर काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची शक्यता

उत्तर मुंबईमधून उर्मिला मातोंडकर काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची शक्यता


मुंबई (वृत्तसंस्था) अभिनेत्री उर्मिला मातोंडकर काँग्रेसकडून मुंबईतून निवडणूक लढवेल, अशी सूत्रांची माहिती आहे. उर्मिला मातोंडकरांचा लवकरच पक्षप्रवेश होणार असून उत्तर मुंबईतून तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

 

उत्तर मुंबईत भाजपचे गोपाळ शेट्टी तगडे उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात एका तगड्या उमेदवाराच्या शोधात काँग्रेस होती. त्यामुळेच उर्मिलाला उमेदवारी देण्याचा विचार काँग्रेस करत असल्याचे वृत्त आहे. याआधी काँग्रेसकडून याठिकाणी आसावरी जोशी, शिल्पा शिंदे यांचीही नावं चर्चेत होती. परंतु अचानक उर्मिला मातोंडकरचे नाव समोर आले. या संदर्भात उर्मिला मातोंडकरकडून मात्र,कोणताही अधिकृत खुलासा केलेला नाहीय.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound