मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील निमखेडी खुर्द येथे प्रशासनाने काढलेला पुतळा पुर्ववत बसविण्यासाठी या प्रकरणी गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी युवक राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड. पवन पाटील यांनी केली आहे.
याबाबत वृत्त असे की, मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी येथे दिनांक १२ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता. त्यामुळे वाद निर्माण झाला घटनास्थळी पोलिस प्रशासन पोहोचून पोलीस आणि तो पुतळा ठिकाणावर हटवला. त्यामुळे पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या घटनेची पाहणी करण्यासाठी पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे या गावांमध्ये दाखल झाले होते.
दरम्यान, या प्रकरणी गावातील ५७ ग्रामस्थांवर गुन्हा दाखल केला असून यातील नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवक उपाध्यक्ष अॅड. पवन पाटील यांनी आज याला विरोध केला आहे. ते म्हणाले की, मराठा समाजावर ती पोलीस प्रशासन अन्य करत आहे ज्या ज्या लोकांना अटक केली आहे त्यांना तात्काळ सोडण्यात यावे ज्या ५७ लोकांवरती गुन्हे दाखल केले आहेत त्यांच्यावरती गुन्हे मागे घ्यावे. प्रशासनाने त्वरित शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणाहून पाठवला आहे त्याठिकाणी बसवण्यात यावा. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल येईल. प्रशासनाने जे गुन्हे दाखल केले आहेत त्यांना त्वरित मागे घेण्यात यावे अशी मागणी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक उपाध्यक्ष पवन पाटील यांनी केली आहे.