Home Cities यावल भालोदमध्ये अमोल जावळे यांचे ग्रामविकास पॅनल विजयी

भालोदमध्ये अमोल जावळे यांचे ग्रामविकास पॅनल विजयी

0
187

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील भालोद येथे सर्वांचे लक्ष लागून असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दिवंगत हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव अमोल जावळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास पॅनेलने दणदणीत विजय संपादन केला आहे.

याबाबत वृत्त असे की, माजी खासदार तथा माजी आमदार व भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांचे अकाली निधन झाल्यानंतर भालोद गावाची पहिलीच ग्रामपंचायत निवडणूक असल्यामुळे येथे नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. दिवंगत हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव अमोल जावळे यांच्या नेतृत्वाखाली येथे ग्रामविकास पॅनेलने सर्व जागा लढवल्या. या निवडणुकीत सुरज निर्माण होणार असल्याचे दिसून आले असले तरी निकालातून मात्र अमोल जावळे यांच्या ग्रामविकास पॅनेलने एक तर्फी दणदणीत विजय संपादन केला आहे. आज लागलेल्या निकालात येथील १५ पैकी तब्बल ११ जागा या अमोल जावळे यांच्या ग्रामविकास पॅनेलने जिंकल्या आहेत. या माध्यमातून भालोद गावावर पुन्हा एकदा जावळे कुटुंबाचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.


Protected Content

Play sound