Home Cities जळगाव भादलीतून तृतीयपंथी अंजली पाटील यांचा विजयी झेंडा (व्हिडीओ)

भादलीतून तृतीयपंथी अंजली पाटील यांचा विजयी झेंडा (व्हिडीओ)

0
41

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील भादली बुद्रुक येथील ग्रामपंचायत निवडणुकीत आव्हान उभे करणार्‍या अंजली पाटील यांनी विजय मिळविला आहे. यामुळे त्या जिल्ह्यातील पहिल्या तृतीयपंथी लोकप्रतिनिधी बनल्या आहेत.

तालुक्यातील भादली बुद्रुक येथील वॉर्ड क्रमांक चारमधून तृतीयपंथी अंजली पाटील ( अंजली जान गुरू संजना जान) यांनी महिला राखीवमधून अर्ज भरला होता. मात्र त्यांचा अर्ज तहसील कार्यालयाने नाकरल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. तेथून त्यांना महिला वर्गवारीत अर्ज भरण्याची परवानगी मिळाली होती. यानंतर त्यांनी अतिशय जोमाने प्रचार केला. वंचित बहुजन आघाडीच्या युवा जिल्हाध्यक्षा शमिभा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केलेल्या प्रचाराला आता यश लाभले आहे.

आज सकाळी झालेल्या मतमोजणीतून वॉर्ड क्रमांक चारमधून अंजली पाटील या विजयी झाल्या आहेत. त्या जिल्ह्यातील पहिल्या लोकप्रतिनिधी बनल्या आहेत.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/394896765141624


Protected Content

Play sound